औरंगाबाद, नोव्हेंबर ४(प्रतिनिधी):- येथील मासूम फाउनडेशनच्या वतीने येथील दिलरास कॉलोनी अरेफ कॉलोनी परिसरात रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १५० पेक्षा जास्त दात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य काद्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी रक्तदानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. या वेळी नगरसेवक झमीर काद्री व आरेफ हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष काझी, मुजाहिद खान परवेझ खान यांची उपस्थिती होती. सदर शिबिराचे आयोजन ग्लोबल फाउनडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. श्री मसिहउद्दीन सिद्दिकी, शेख एजाज, शेख इम्रान, सोमनाथ दादा, रामचंद्र, वासिम, विनोद, अझीम मौलाना, इरफान, जावेद, सलमान बाळू भालेराव, इब्राहीम, शोएब आदींनी परिश्रम केले.
मासूम फाउनडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे समारोप