कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने विंडीजवर मात करत ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने खिशात घातली. यात खेळताना मराठमोळ्या स्मृती मानधनाने ७४ धावांची अर्धशतकी खेळी केली. सोबतच एका विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे. वेस्ट इंडिज सोबतच्या महिला क्रिकेट संघांच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत मालिका 2-1 अशी जिंकली आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात भारताने 6 विकेट राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजचे 194 धावांचे लक्ष्य भारतीय महिलांनी 42.1 षटकांत पूर्ण केले. या सामन्यात स्मृती मानधनाने वन-डे क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. स्मृती मानधनाने केवळ ५१ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. याआधी भारताच्या शिखर धवनने ४८ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली होती. याचसोबत महिला क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करुन दाखवणारया फलंदाजांच्या यादीत स्मृती तिसऱ्या स्थानी आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क आणि मेग लेनिंग या महिला फलंदाजांनी सर्वात जलद २ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
स्मृती मानधनाचा विक्रम जगात पटकावले तिसरे स्थान